
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अपारशक्ती खुरानाने त्याची पत्नी आकृती आहुजा या दोघांनी प्रेक्षकांना एक परफेक्ट ट्रीट दिली आहे. ‘होर कोई ना’ हे खास प्रेम गीत ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. अपारशक्ती त्याच्या चाहत्यांना या गाण्यातून खास ट्रीट देणार आहेत.
संबंधित बातम्या –
‘नवी जन्मेन मी..’नव्या वळणावर; स्वानंदीच्या बाबतीत घडली अघटित
Dunki OTT released : डंकी ओटीटीवर रिलीज, शाहरुख खानचा इमोशनल ड्रामा
Kavita Chaudhary Passed Away : ‘उडान’ फेम अभिनेत्री कविता चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मनसिमरन संधू यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यासोबत ही मधुर धून त्याच्या आणि त्याची पत्नी आकृती आहुजा यांच्यातील जोडीचा अनोखा संगम यातून अनुभवयाला मिळणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana)
या गाण्याबद्दल बोलताना अपारशक्ती म्हणाला, “मला वाटलं व्हॅलेंटाईनसाठी काहीतरी खास करू. आम्ही पहिल्यांदा एकत्र गाणे केले आहे. आकृतीला तिच्या कामाची बांधिलकी आणि आईची कर्तव्ये लक्षात घेऊन तिला पटवणे कठीण होतं. पण, सोबतीने एक गाणं आम्हाला करायचं होत. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियामध्ये शूट करण्यात आला आहे. तसे गाण्याच्या पहिल्या काही ओळी सांगतात की, मी तिला कॉल करत राहिलो आणि ती माझे फोन कॉल उचलत नाही. वास्तविक जीवनातही आकृतीसाठी अगदी योग्य आहे. गीतकार आणि संगीत दिग्दर्शक मनसिमरन संधू यांचे सर्वात ऑर्गेनिक लेखन आणि रचनेबद्दल खूप आभार.”
View this post on Instagram
A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana)
Latest Marathi News अपारशक्ती खुराना-आकृती आहुजाचे ‘होर कोई ना’ भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.
