हवामान उपग्रहासाठी ISRO सज्ज; INSAT-3DS चे उद्या प्रक्षेपण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) यावर्षातील दुसरी महत्त्वाची मोहिम हाती घेतली आहे. इस्रोच्या हवामानविषयक उपग्रह INSAT-3DS चे उद्या शनिवारी (दि.१६) GSLV F14 सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३५ वाजता, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे, असे इस्रोने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून सांगितले आहे.
इस्रोच्या INSAT-3DS या हवामानविषयक उपग्रहाने बंगळूरमधील यूआर राव उपग्रह केंद्रात उपग्रह संयोजन, एकत्रीकरण आणि उपक्रम चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तसेच पुढे ISRO ने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, GSLV’sच्या या १६ व्या मोहिमेत लक्ष्य निर्धारित केले आहे. इनसॅट-3डी हा उपग्रह हवामानशास्त्र आणि आपत्ती चेतावणीशी संबंधित आहे. या मोहिमेला संपूर्णपणे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून निधी दिला जाणार असल्याचे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.
इनसॅट 3DS हा एक अद्वितीय हवामानशास्त्रीय उपग्रह आहे. ज्याचा प्राथमिक उद्देश सध्याच्या कक्षेत असलेल्या इनसॅट-3डी आणि 3डीआर उपग्रहांना सेवांची सातत्यता प्रदान करणे. इन्सॅट प्रणालीच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करणे आहे. इस्रोचा हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयसह (MoES) युजर्स अनुदानित प्रकल्प आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेस एजन्सी फेब्रुवारीच्या मध्यात प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.
GSLV-F14/INSAT-3DS Mission:
27.5 hours countdown leading to the launch on February 17, 2024, at 17:35 Hrs. IST has commenced. pic.twitter.com/TsZ1oxrUGq
— ISRO (@isro) February 16, 2024
हे ही वाचा :
बंगळुरात धावणार विनाचालक मेट्रो
जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोचिन विमानतळावर
Latest Marathi News हवामान उपग्रहासाठी ISRO सज्ज; INSAT-3DS चे उद्या प्रक्षेपण Brought to You By : Bharat Live News Media.
