आता शब्दांपासून थेट बनणार व्हिडिओ! OpenAI चे ‘सोरा’ टूल लाँच

पुढारी ऑनलाईन डेस्क : OpenAI tool Sora : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओपन एआयने (OpenAI) आपले नवीन एआय (AI) टूल सोरा (Sora)ची घोषणा केली आहे. ओपन एआयचे सोरा मॉडेल हे लिखित शब्दांच्या मदतीने एक मिनिटाचे हाय-डेफिनिशन व्हिडिओ तयार करू शकते. कंपनीने म्हटले आहे की सोरा अनेक वर्ण, विशिष्ट प्रकारची गती, विषयाचे अचूक तपशील … The post आता शब्दांपासून थेट बनणार व्हिडिओ! OpenAI चे ‘सोरा’ टूल लाँच appeared first on पुढारी.

आता शब्दांपासून थेट बनणार व्हिडिओ! OpenAI चे ‘सोरा’ टूल लाँच

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : OpenAI tool Sora : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओपन एआयने (OpenAI) आपले नवीन एआय (AI) टूल सोरा (Sora)ची घोषणा केली आहे. ओपन एआयचे सोरा मॉडेल हे लिखित शब्दांच्या मदतीने एक मिनिटाचे हाय-डेफिनिशन व्हिडिओ तयार करू शकते. कंपनीने म्हटले आहे की सोरा अनेक वर्ण, विशिष्ट प्रकारची गती, विषयाचे अचूक तपशील आणि पार्श्वभूमी असलेले जटिल व्हिडिओ तयार करण्यास सक्षम आहे. गुणवत्तेच्या बाबतीतही हे सोरा टूल्स गुगल आणि मेटा यांनी बनवलेल्या टूल्सपेक्षा सरस असल्याचा दावा केला जात आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, ओपन एआयने (OpenAI) तयार केलेल्या चॅट जीपीटी (ChatGPT)ची नेहमीच चर्चा होत असते. आता ओपन एआयने (OpenAI) नवीन सोरा हे एआय लाँच करणार आहे, ज्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. सोराच्या मदतीने तुम्ही फक्त मजकूर स्वरूपात प्रश्न विचारून 1 मिनिटाचा हाय-डेफिनिशन व्हिडिओ तयार करू शकता. (OpenAI tool Sora)
सॅम ऑल्टमन यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सोराच्या मदतीने बनवलेली व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. ते म्हणता की, सध्या सोरा हे टूल संशोधनाच्या टप्प्यात असून लवकरच ते सर्वांच्या वापरासाठी खुले होईल, आज आम्ही रेट-टाइमिंग सादर करत आहोत आणि मर्यादित संख्येच्या निर्मात्यांना प्रवेश प्रदान करत आहोत,’ असे चॅट जीटीपीच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

here is sora, our video generation model:https://t.co/CDr4DdCrh1
today we are starting red-teaming and offering access to a limited number of creators.@_tim_brooks @billpeeb @model_mechanic are really incredible; amazing work by them and the team.
remarkable moment.
— Sam Altman (@sama) February 15, 2024

एआय सोरा नेमके काय आहे? (OpenAI tool Sora)
एआय सोरा हे टेक्स्ट-टू-व्हिडिओ जनरेटर एआय टूल आहे, जे तुम्ही मजकूर स्वरूपात कोणताही प्रश्न विचारून 1-मिनिटाचा उच्च-गुणवत्तेचा व्हिडिओ तयार करू शकता. हे ChatPGT सारखे नवीन AI टूल आहे, जे टेक्स्ट प्रॉम्प्टच्या मदतीने वास्तववादी आणि जटिल व्हिडिओ तयार करण्यास सक्षम आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, ते लिखित कथा आणि कवितांचे व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकते.
Latest Marathi News आता शब्दांपासून थेट बनणार व्हिडिओ! OpenAI चे ‘सोरा’ टूल लाँच Brought to You By : Bharat Live News Media.