मुंबई : गोपाळकृष्ण गोखले पूल मार्चमध्ये होणार सुरू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  अंधेरी पूर्व पश्चिम जोडणार्‍या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक मार्गिका मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुली करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्याचे सपाटीकरण व अन्य कामे अंतिम टप्प्यात आहे. कोस्टल रोडच्या लोकार्पणाच्या दिवशीच गोखले पुलाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित बातम्या  राज्यसभेवर जाणारे सारेच कोट्यधीश; प्रफुल्ल पटेल सर्वाधिक श्रीमंत कोल्हापूर: … The post मुंबई : गोपाळकृष्ण गोखले पूल मार्चमध्ये होणार सुरू appeared first on पुढारी.

मुंबई : गोपाळकृष्ण गोखले पूल मार्चमध्ये होणार सुरू

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा :  अंधेरी पूर्व पश्चिम जोडणार्‍या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक मार्गिका मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुली करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्याचे सपाटीकरण व अन्य कामे अंतिम टप्प्यात आहे. कोस्टल रोडच्या लोकार्पणाच्या दिवशीच गोखले पुलाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या 

राज्यसभेवर जाणारे सारेच कोट्यधीश; प्रफुल्ल पटेल सर्वाधिक श्रीमंत
कोल्हापूर: मुरलीधर जाधव यांचा ५ हजार शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश
Pawar Vs Sule : बारामतीत नणंद-भावजय असाच सामना; सुनेत्रा पवार राहणार उभ्या 

अंधेरी पूर्व व पश्चिमला जोडणारा गोखले पूल धोकादायक घोषित करण्यात आल्यामुळे नोव्हेंबर 2022 पासून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल 2023 च्या दिवाळीपर्यंत पुन्हा सुरू केला जाईल, असे त्यावेळी पालिकेकडून सांगण्यात आले होते. पण पुलाचे काम लांबणीवर पडल्यामुळे एक मार्गिका सुरू करण्यासाठी 14 फेब्रुवारी ही डेडलाईन देण्यात आली. पण, ती डेडलाईनही उलटून गेली आहे.
काम पूर्ण न झाल्यामुळे आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक मार्गिका सुरू करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या या एका मार्गिकेचे 90 टक्क्यांवर काम पूर्ण झाले असून, रस्त्याचे सपाटीकरण, स्ट्रीट लाईट व अन्य कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण केली जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
पुलाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे मार्गावरील गर्डर टाकण्याचे काम 3 डिसेंबरला पहाटे पूर्ण करण्यात आले. मात्र, हा गर्डर पुलाच्या पिलरपर्यंत 7.5 मीटर खाली आणण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यामुळे पुलावर लोखंडी सळ्या अंथरून सिमेंट काँक्रिटीकरणास विलंब झाला. गेल्या आठवड्याभरापासून रस्त्याच्या सपाटीकरणासह अन्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामे सुरू असून ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
Latest Marathi News मुंबई : गोपाळकृष्ण गोखले पूल मार्चमध्ये होणार सुरू Brought to You By : Bharat Live News Media.