मिरजेत बांधकामाची भिंत पडून कामगाराचा मृत्यू

मिरज : Bharat Live News Media वृत्तसेवा सांगलीतील मिरज मध्ये बांधकामाची भिंत अंगावर पडल्याने तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिरज लक्ष्मी मार्केट परिसरात एका अपार्टमेंटचे काम सुरू होते. बांधकाम सुरू असताना 15 फूट उंचीची बांधकाम सुरू असलेली भिंत कामगारांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे तिघे कर्मचारी भिंतीखाली दबले गेले होते. तिघांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :
Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ अधिसूचनेची अंमलबजावणी करा नाही तर…जरांगेंचा सरकारला इशारा
Comrade Govind Pansare Case : पानसरेंनी ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक लिहिले म्हणून हत्या; कुटुंबीयांचा हायकोर्टात दावा
प्राथमिक शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा विरोध
Latest Marathi News मिरजेत बांधकामाची भिंत पडून कामगाराचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
