राष्ट्रीय साखर कारखाना महासंघावर भाजपचे वर्चस्व; शरद पवारांना धक्का

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची शुक्रवारी (दि.१६) बिनविरोध निवड करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांचीही बिनविरोध निवड झाली. राष्ट्रीय सहकारी … The post राष्ट्रीय साखर कारखाना महासंघावर भाजपचे वर्चस्व; शरद पवारांना धक्का appeared first on पुढारी.

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघावर भाजपचे वर्चस्व; शरद पवारांना धक्का

इंदापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची शुक्रवारी (दि.१६) बिनविरोध निवड करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांचीही बिनविरोध निवड झाली.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची सन २०२४ ते २९ ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर नवी दिल्ली येथे महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हा शरद पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
हर्षवर्धन पाटील हे देशातील व राज्यातील सहकारी साखर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके सक्रियपणे कार्यरत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे महत्वाचे समजले जाणारे सहकार मंत्रीपद सुमारे ९ वर्षे सांभाळले आहे. तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना या दोन्ही महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून अनेक वर्षे काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
शेतकरी व देशातील साखर उद्योगांच्या अडचणी व समस्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यावर आपला भर राहील तसेच देशातील व राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या गुणवत्तावाढी बरोबरच त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही निवडीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
दरम्यान, देशपातळीवरील साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
 हे ही वाचा :

अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पवार विरुद्ध पवार लढत : रोहित पवार
Pawar Vs Sule : बारामतीत नणंद-भावजय असाच सामना; सुनेत्रा पवार राहणार उभ्या 

Latest Marathi News राष्ट्रीय साखर कारखाना महासंघावर भाजपचे वर्चस्व; शरद पवारांना धक्का Brought to You By : Bharat Live News Media.