बारामतीत नणंद-भावजय असाच सामना 

बारामती : पुढारी वृत्तसेवा, राष्ट्रवादीतील फूटीनंतर पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाल्यानंतर बारामतीतून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. आजच (दि.१६) यासंबंधीची घोषणा अजित पवार यांच्याकडून होवू शकते. सुनेत्रा पवार यांची माहिती देणारे चित्ररथ शुक्रवारी बारामतीत फिरू लागले. त्यामुळे नणंद-भावजय संघर्ष अटळ असल्याचे … The post बारामतीत नणंद-भावजय असाच सामना  appeared first on पुढारी.

बारामतीत नणंद-भावजय असाच सामना 

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा, राष्ट्रवादीतील फूटीनंतर पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाल्यानंतर बारामतीतून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. आजच (दि.१६) यासंबंधीची घोषणा अजित पवार यांच्याकडून होवू शकते. सुनेत्रा पवार यांची माहिती देणारे चित्ररथ शुक्रवारी बारामतीत फिरू लागले. त्यामुळे नणंद-भावजय संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट झाले. (Pawar Vs Sule)

Pawar Vs Sule : बारामतीत नणंद-भावजय असाच सामना

शुक्रवारी सकाळपासून सुनेत्रा पवार यांच्या विविध विकासकामांचा आढावा घेणारा चित्ररथ बारामती शहरात फिरू लागल्याने या चर्चांना उधाण आले. त्यातच आज (दि.१६) उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध मेळाव्यांच्या निमित्ताने बारामतीत असून खासदार सुप्रिया सुळे यादेखील दिवसभर बारामतीमध्ये आहेत. त्यातच सुनेत्रा पवार यांचा हा रत फिरू लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवाय बारामतीत आलेल्या आमदार रोहित पवार यांनीही भाजपने अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत पवार विरुद्ध पवार सामना रंगवण्यास सुरुवात केल्याची टीका केली. एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या घडामोडी पाहता बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार याच निवडणूक रिंगणात राहतील असे चित्र आहे. त्या दृष्टीने सुनेत्रा पवार यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यांना सुरुवात केली असून ते विविध गावांना भेट देत आहेत गुरुवारी त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबीयांना भेट दिली होती. बारामतीतही विविध कार्य़क्रमांना त्या आवर्जून हजेरी लावत आहेत.

हेही वाचा:

Pakistan Elections 2024 : पाकिस्तान पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच कायम; दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल
‘काही गोष्टी गुलदस्त्यातच…’ प्रफुल्ल पटेलांनी सांगितले खासदारकी असतानाही का भरला अर्ज?
Rohit Sharma Century : कॅप्टन इनिंग..! राजकोट कसोटीत रोहीत शर्माचे दमदार शतक

Latest Marathi News बारामतीत नणंद-भावजय असाच सामना  Brought to You By : Bharat Live News Media.