ECI च्या निर्णयाविरोधात शरद पवारांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

Bharat Live News Media ऑनलाईन : अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. (Pawar Vs Pawar)
वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी या याचिकेचा तत्काळ सूचीबद्ध करण्यासाठी उल्लेख केला आहे. कारण निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप स्वीकारावा लागणार आहे. त्यावर न्यायालयाने, हे प्रकरण त्वरित सूचीबद्ध करता येईल का? हे पाहावे लागणार असल्याचे म्हटले आहे. (Pawar Vs Pawar)
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने आरोप केला आहे की, त्यांचा गट गुंतागुंतीच्या परिस्थितीत अडकला आहे. कारण त्यांना येत्या २० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात अजित पवार गटाच्या निर्देशांच्या अधीन राहण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar seeks an urgent hearing before the Supreme Court of the plea against the order of the Election Commission of India officially recognising Ajit Pawar faction as the ‘real’ Nationalist Congress Party (NCP).
Senior advocate Abhishek Manu Singhvi mentions the matter for… pic.twitter.com/CiU5txCJ9x
— ANI (@ANI) February 16, 2024
Latest Marathi News ECI च्या निर्णयाविरोधात शरद पवारांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव Brought to You By : Bharat Live News Media.
