करण वाही-जेनिफर विंगेट १४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र

Bharat Live News Media ऑनलाईन : आपण सर्वांनी पडद्यावर करण आणि जेनिफर यांचा रोमान्स पाहिला आहे. पण १४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ते पुन्हा एकत्र येण्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. (Raisinghani vs Raisinghani) सिरीज ‘रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी’मधील त्यांचे एकत्र येणे जुन्या आठवणींना उजाळा देते. ही सिरीज त्यांच्या पात्रांची उत्तम केमिस्ट्री दाखवते. आता १४ वर्षानंतर जेनिफर विंगेट आणि करण वाही एकत्र काम करताना दिसणार आहे. (Raisinghani vs Raisinghani)
संबंधित बातम्या –
‘कन्नी’ : ऋताला हवीय मित्रांची साथ, परदेशात नोकरीसाठी मित्र करणार का मदत?
Dunki OTT released : डंकी ओटीटीवर रिलीज, शाहरुख खानचा इमोशनल ड्रामा
K L Rahul-Athiya Shetty : के एल राहुलसोबत अथिया शेट्टी आफ्रिकेच्या जंगल सफारीवर
View this post on Instagram
A post shared by Karan Wahi (@karanwahi)
जवळपास दशकभरानंतर पुन्हा एकत्र येण्याबाबत करण वाही म्हणाला, ”१४ वर्षांनंतर जेनीसोबत पडद्यावर काम करण्याचा क्षण आमच्यासाठी, तसेच आमच्या चाहत्यांसाठी नॉस्टॅल्जिक आहे. पण यावेळी आमच्यामधील केमिस्ट्री, तसेच आमच्या भूमिका बदलल्या आहेत. रोमँटिकच्या तुलनेत प्रेक्षकांना आमच्यामधील शत्रुत्व, विमोचन आणि उत्कटता पाहायला मिळेल, ज्यामुळे प्रेक्षक सिरीजकडे अधिक आकर्षित होतील. आमच्या भूमिकांमध्ये अनेक भावना व गुंतागूंती सामावलेल्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक सीनमध्ये उत्कटता व उत्सुकता आहे. हे फक्त एकत्र येणे नसून पडद्यावरील आमच्या डायनॅमिक्सना देण्यात आलेला नवीन लूकदेखील आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा बदल आवडेल.”
View this post on Instagram
A post shared by Sony LIV (@sonylivindia)
‘रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी’ या तीन प्रोफेशनल्सच्या जीवनाला सादर करण्यासह नैतिक पेचप्रसंगांची गुंतागूंत आणि सोप्या मार्गापेक्षा योग्य मार्ग निवडण्याच्या आव्हानाला दाखवते. जेनिफर विंगेट आणि करण वाही यांच्या व्यतिरिक्त या सिरीजमध्ये रीम शेख देखील आहे. ‘रायसिंघानी व्हर्सेस रायसिंघानी’ दर सोमवार ते बुधवार रात्री ८ वाजता फक्त सोनी लिव्हवर पाहता येईल.
View this post on Instagram
A post shared by Sony LIV (@sonylivindia)
View this post on Instagram
A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)
Latest Marathi News करण वाही-जेनिफर विंगेट १४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र Brought to You By : Bharat Live News Media.
