ऋताला हवीय मित्रांची साथ, परदेशात नोकरीसाठी मित्र करणार का मदत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण … The post ऋताला हवीय मित्रांची साथ, परदेशात नोकरीसाठी मित्र करणार का मदत? appeared first on पुढारी.

ऋताला हवीय मित्रांची साथ, परदेशात नोकरीसाठी मित्र करणार का मदत?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ऋताला परदेशात नोकरी करून तिचे आयुष्य सुखकर करायचे आहे. यासाठी तिला तिच्या मित्रांची साथ हवी आहे. परंतु या सगळ्यात तिचे मित्र तिला साथ देणार का तिचे हे स्वप्न अधुरे राहून तिला तिच्या मायदेशी परतावे लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना ८ मार्चला मिळणार आहे.
संबंधित बातम्या –

Dunki OTT released : डंकी ओटीटीवर रिलीज, शाहरुख खानचा इमोशनल ड्रामा
Yodha Poster : १३ हजार फुटांवर फडकावलं Yodha Poster, सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ने केलं रेकॉर्ड
Shivrayancha Chhava : भव्य ऐतिहासिकपट ‘शिवरायांचा छावा’ उद्या चित्रपटगृहात

टिझरवरून हा चित्रपट मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे दिसतेय. यात प्रेम, मैत्री, स्वप्नांचा मागोवा घेणाऱ्या कथेला विनोदाची आणि भावनांचीही जोड आहे. ‘कन्नी’चे लेखनही समीर जोशी यांचे असून यात ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर आणि अजिंक्य राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” आयुष्यात प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असते. आपल्या स्वप्नांसोबत उंच भरारी घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नात असतो. ‘कन्नी’मधील कल्याणीही तशीच आहे. कल्याणी ही आपल्या आजुबाजूला वावरणाऱ्या सर्वसामान्य मुलीसारखी आहे. म्हणूनच ही कथा प्रेक्षकांना आपल्या जवळची वाटेल. हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. जो प्रत्येकाने आपल्या कटुंबासोबतच पाहावा.’’
Latest Marathi News ऋताला हवीय मित्रांची साथ, परदेशात नोकरीसाठी मित्र करणार का मदत? Brought to You By : Bharat Live News Media.