
Bharat Live News Media ऑनलाईन : जागतिक बाजारातील वाढीचा मागोवा घेत भारती शेअर बाजार शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी उच्च पातळीवर उघडला. बाजारातील तेजीत बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढून ७२,४०० वर तर निफ्टी १२० अंकांनी वाढून २२ हजारांवर व्यवहार केला. बहुतांश क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर मारुती, टाटा मोटर्स, एम अँड एम, एलटी, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, टायटन, विप्रो हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर पॉवर ग्रिड, आयटीसी हे शेअर्स घसरले आहे.
निफ्टीवर बीपीसीएल, मारुती, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, एम अँड एम हे सर्वाधिक वाढले आहेत. तर पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, आयटीसी, ब्रिटानिया, एचसीएल टेक हे घसरले आहेत.
जागतिक बाजार
अमेरिकेतील किरकोळ विक्रीत मोठी घसरण झाल्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता पुनरुज्जीवित झाली आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या निक्केईने शुक्रवारी सर्वकालीन उच्चांक गाठला. यामुळे अमेरिकेतीलए एस अँड पी, नॅस्डॅक कंपोझिट आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज काल गुरुवारी वाढून बंद झाले. तर जपानचा निक्केई १.६ टक्क्यांनी वाढून ३८,८०० जवळ सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.
हे ही वाचा :
MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सवर भारताचे वेटेज नव्या उच्चांकावर; ‘या’ स्टॉक्सना होणार फायदा
Reliance ची कमाल! बनली २० लाख कोटींचे मार्केट कॅप ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी
Latest Marathi News तेजीचा चौकार! सेन्सेक्स ७२,४०० वर, ‘हे’ शेअर्स आघाडीवर Brought to You By : Bharat Live News Media.
