15 वर्षांत दिला 10 मुलांना जन्म

न्यूयॉर्क : ‘हम दो, हमारे दो’ हा गेली कित्येक दशके अगदी परवलीचा मंत्र ठरत आला आहे. पण, कॅरिसा कोलिन्स ही एक महिला अशीही आहे, जिने मागील 15 वर्षांत तिने 10 मुलांना जन्म दिला आहे. यापूर्वी तिला दहावे अपत्य झाले असून, आता हे दाम्पत्य 11 व्या मुलाच्या प्रतीक्षेत आहे. हसता खेळता परिवार म्हणून या कुटुंबाला सोशल मीडियावर ओळखले जाते.
10 मुलांची आई असलेल्या या आईने आपण दरवर्षी एका मुलाला जन्म देण्याचे शिवधनुष्य सहज उचलू शकते, असे यावेळी म्हटले. 40 वर्षीय कॅरिसाला 3 मुले व 7 मुली आहेत. अमेरिकेतील निवासी असणारी ही महिला आपल्या संसाराचे अनेक व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करत असते.
टिकटॉकवर तिचे सध्या 3 कोटी फॉलोअर्स आहेत. कॅरिसाची सर्वात मोठी कन्या एनिसा 14 वर्षांची आहे तर आर्मर हा चिरंजीव सर्वात लहान आहे. कुटुंबासाठी आपण समर्पित असून आपल्या पतीचा आपल्याला अभिमान आहे, असेही ती आवर्जून सांगते. आपल्या 10 मुलांचा एक व्हिडीओ तिने टिकटॉकवर शेअर केला असून, या व्हिडीओला 55 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
Latest Marathi News 15 वर्षांत दिला 10 मुलांना जन्म Brought to You By : Bharat Live News Media.
