जगातील सर्वात अवघड नोकरी!

नवी दिल्ली : प्रत्येक नोकरी छोटी-मोठी किंवा अवघड-सोपी नसते, असे म्हटले जाते. पण, ती करताना ज्याप्रमाणे मेहनत आवश्यक असते. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणाही तितकाच आवश्यक असतो. तसे पाहता जगभरात अनेक प्रकारच्या नोकर्‍या आहेत; मात्र एक नोकरी अशीही आहे, जी जगातील सर्वात अवघड नोकरी म्हणून ओळखली जाते. आता ही नोकरी कोणती, ती कुठे आहे आणि ती इतकी अवघड … The post जगातील सर्वात अवघड नोकरी! appeared first on पुढारी.

जगातील सर्वात अवघड नोकरी!

नवी दिल्ली : प्रत्येक नोकरी छोटी-मोठी किंवा अवघड-सोपी नसते, असे म्हटले जाते. पण, ती करताना ज्याप्रमाणे मेहनत आवश्यक असते. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणाही तितकाच आवश्यक असतो. तसे पाहता जगभरात अनेक प्रकारच्या नोकर्‍या आहेत; मात्र एक नोकरी अशीही आहे, जी जगातील सर्वात अवघड नोकरी म्हणून ओळखली जाते.
आता ही नोकरी कोणती, ती कुठे आहे आणि ती इतकी अवघड का आहे, असे प्रश्न साहजिकच उपस्थित होतील. रशियामध्ये ही जगातील सर्वात अवघड नोकरी आहे. रशिया थंड ठिकाण असून, कडाक्याची थंडी असताना येथील तापमान अगदी उणे 50 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. इतक्या गारठ्यातही येथील नागरिकांना कार्यरत राहणे भाग असते. रशियातील पूर्वेकडे एक बर्फाच्छादित शिपयार्ड असून तेथे ही कठीण नोकरी आहे आणि यात काम असते शिपयार्डभोवती जमणारे बर्फाचे ढीग बाजूला करणे!
शिपयार्डभोवतीचे बर्फ बाजूला काढण्याच्या या कामाला ‘विमोरोझ्का’ असे म्हटले जाते. या कामाला ‘फ्रीझिंग आऊट’ असेही म्हणतात.जगातील सर्वात कठीण कामांमध्ये याचा आवर्जून समावेश होतो. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, रशियातील याकुतिया येथील स्थानिक लोक ‘विमोरोझ्का’ला जगातील सर्वात कठीण काम म्हणतात. हिवाळ्यात जेव्हा बंदरावर बर्फाचे जाड थर पसरतात आणि ते काढायला खूप कठीण होतात. तेव्हा हे काढण्यासाठी कर्मचार्‍यांना भयंकर थंडीतही काम करावे लागते. प्रतिकूल वातावरण, कडाक्याची थंडी आणि तितकेच जिकिरीची, कठीण जबाबदारी यामुळे याला ‘जगभरातील सर्वात अवघड नोकरी’ अशी ओळख मिळाली आहे.
Latest Marathi News जगातील सर्वात अवघड नोकरी! Brought to You By : Bharat Live News Media.