मराठा समाजाच्या राज्यव्यापी सर्वेंक्षणाचा अहवाल सरकारला सादर

Bharat Live News Media ऑनलाईन : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाने केलेल्या राज्यव्यापी सर्वेंक्षणाचा अहवाल आज शुक्रवारी राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा अहवाल सुपूर्द केला. ‘हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येईल आणि निर्णय घेण्यात येईल. २० फेब्रुवारीला बोलावण्यात आलेल्या अधिवेशनात यावर चर्चा होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सव्वा दोन कोटीहून कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
विशेषत: यात मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीची माहिती गोळा करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल आयोगामार्फत शुक्रवारी सरकारला सादर करण्यात आला.
Latest Marathi News मराठा समाजाच्या राज्यव्यापी सर्वेंक्षणाचा अहवाल सरकारला सादर Brought to You By : Bharat Live News Media.
