77 हजार रुपयांचा टॉवेल!

कॅलिफोर्निया : सध्याचे जग असे आहे, ज्यात केव्हा कुठली फॅशन येईल, हे सांगता येणार नाही. त्यातही महागड्या ब्रँड्समध्ये काही तरी जगावेगळी फॅशन सादर करण्यात तर कमालीची चढाओढ असते. यादरम्यान त्यांचे प्रयोग देखील इतके अफलातून असतात की, त्यावर क्षणभर विश्वास देखील ठेवता येत नाही. सध्या अशाच एका टॉवेल स्कर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या टॉवेलचे … The post 77 हजार रुपयांचा टॉवेल! appeared first on पुढारी.

77 हजार रुपयांचा टॉवेल!

कॅलिफोर्निया : सध्याचे जग असे आहे, ज्यात केव्हा कुठली फॅशन येईल, हे सांगता येणार नाही. त्यातही महागड्या ब्रँड्समध्ये काही तरी जगावेगळी फॅशन सादर करण्यात तर कमालीची चढाओढ असते. यादरम्यान त्यांचे प्रयोग देखील इतके अफलातून असतात की, त्यावर क्षणभर विश्वास देखील ठेवता येत नाही. सध्या अशाच एका टॉवेल स्कर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या टॉवेलचे अनोखे वैशिष्ट्य असे की, तो थोडाथोडका नव्हे तर चक्क 77 हजार रुपयांचा आहे. अर्थातच, सोशल मीडियावर या टॉवेलची बरीच चर्चा रंगली आहे.
हा अनोखा आणि तितकाच महागडा टॉवेल बॅलेन्सियागा कंपनीने लाँच केला आहे. पुढील हंगामासाठी त्यांनी बरेच कलेक्शन लाँच केले असून त्यात या महागड्या टॉवेलचा समावेश आहे. या टॉवेल स्कर्टची किंमत ही 925 डॉलर (77 हजार रुपये) असल्याचे म्हटले जात आहे. हे ब्रँड आंघोळीचे टॉवेल हे 31,572 रुपयात विकतात. हे टॉवेल पांढरा आणि करडा अशा दोन रंगात सध्या उपलब्ध करून दिले गेले आहेत.
आता 77 हजारांचे टॉवेल म्हणजे त्याचे ट्रोलिंग होणारच. या ट्रोलिंगमध्ये आश्चर्य म्हणजे या फर्निचर कंपनीने देखील भाग घेतला आहे. या कंपनीने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून टॉवेलची खिल्ली उडवत स्वत:चा टॉवेल स्कर्ट लाँच केला आहे आणि त्याची किंमत अवघी 1654 रुपये इतकी निश्चित केली आहे. योगायोग म्हणजे बॅलेन्सियागावर ज्याप्रमाणे या टॉवेलची जाहिरात केली गेली, त्याचप्रमाणे फर्निचर कंपनीच्या जाहिरातीत त्याची कॉपी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अर्थातच या 77 हजारांच्या या टॉवेलची खिल्ली उडवली असून हा टॉवेल विकत घेण्यासाठी एखाद्याला अंगावरचे कपडेही विकावे लागतील, असे एका युजरने म्हटले आहे.
The post 77 हजार रुपयांचा टॉवेल! appeared first on पुढारी.

कॅलिफोर्निया : सध्याचे जग असे आहे, ज्यात केव्हा कुठली फॅशन येईल, हे सांगता येणार नाही. त्यातही महागड्या ब्रँड्समध्ये काही तरी जगावेगळी फॅशन सादर करण्यात तर कमालीची चढाओढ असते. यादरम्यान त्यांचे प्रयोग देखील इतके अफलातून असतात की, त्यावर क्षणभर विश्वास देखील ठेवता येत नाही. सध्या अशाच एका टॉवेल स्कर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या टॉवेलचे …

The post 77 हजार रुपयांचा टॉवेल! appeared first on पुढारी.

Go to Source