रशियाने शोधली कॅन्सरवरील रामबाण लस

मॉस्को; वृत्तसंस्था : रशियाच्या संशोधकांना कॅन्सरवरील रामबाण लस शोधण्यात यश आले असून ती लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असली तरी कोणत्या प्रकारच्या कॅन्सरसाठी ही लस असेल, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
भविष्यातील तंत्रज्ञान या विषयावरील परिसंवादाचे मॉ स्कोत आयोजन करण्यात आले होते. त्याच्या मुख्य सत्रात दूरसंवाद माध्यमातून सहभागी झालेल्या पुतीन यांनी रशियाच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतानाच सार्या जगाला सुटकेचा नि:श्वास टाकायला लावणारी ही घोषणा केली. ते म्हणाले, रशियन वैज्ञानिकांना कॅन्सरवरील लस तयार करण्यात यश आले आहे. वैयक्तिक उपचारात वापरण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक म्हणून नव्या पिढीचे औषध म्हणून ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस लवकरच उपलब्ध होणार असून त्याचा कोट्यवधी लोकांना फायदा होईल.
Latest Marathi News रशियाने शोधली कॅन्सरवरील रामबाण लस Brought to You By : Bharat Live News Media.
