पट्टणकोडीलीत ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला मारहाण; स्टेटस वरून वाद

हुपरी, Bharat Live News Media वृत्तसेवा : स्टेटस लावल्याच्या कारणावरून पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे गुरुवारी रात्री शिवसेनेच्या दोन गटांत राडा झाला. ठाकरे गटाचे शहरप्रमुख अण्णासाहेब जाधव यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हुपरी पोलिसांत गुन्हा दखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून हुपरी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी होती.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व मुखमंत्री एकनाथ शिंदें यांचा पट्टणकोडोली येथील विठ्ठल राम्माण्णा या जाधव समर्थकांनी व्हॉटस्अॅपवर स्टेटस लावला होता. या स्टेटसवरून ठाकरे गटाचे शहरप्रमुख अण्णासाहेब जाधव यांचा मुलगा प्रथमेश व राम्माण्णा यांच्यात व्हॉटस्अॅपवर वाद झाला. त्यानंतर राम्माण्णा संतप्त झाले. ते समर्थकांसह जाब विचारण्यासाठी अण्णासाहेब जाधव यांच्या घराजवळ गेले असता तिथे वादावादी होऊन मारामारी झाली.
यात जाधव यांना जबर मार लागला. त्यांच्या पत्नी व मुलालाही मारहाण झाल्याचे समजते. त्यांनी हुपरी पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. यासंदर्भात गावात तणावपूर्ण शांतता आहे. राम्माण्णा यांच्यासह सहा ते सात जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते .
Latest Marathi News पट्टणकोडीलीत ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला मारहाण; स्टेटस वरून वाद Brought to You By : Bharat Live News Media.
