मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू; मागण्यांवर ठाम

वडीगोद्री; Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत चाललेली असताना अखेर त्यांनी स्वतःवर उपचार करवून घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांना तातडीने सलाईन लावण्यात आली असून, अन्य उपचारही सुरू करण्यात आले आहेत. स्वतःवर तातडीने उपचार करवून घ्या, असे निर्देश जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयानेही दिले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.
दुसरीकडे, सरकारी शिष्टमंडळाशी गुरुवारी त्यांची झालेली चर्चा फोल ठरली आहे. सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावी करा यासह अन्य पाच प्रमुख मागण्यांवर सरकारने काय केले, असा सवाल जरांगे यांनी त्यांच्याशी चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला विचारला. शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना सरकारकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. तथापि, मराठा समाजाने केलेल्या मागण्या मान्य असल्याचे लेखी स्वरूपात लिहून आणा. आता समाज शांत बसणार नाही, असे त्यांनी शिष्टमंडळाला बजावले.
श्रेयासाठीच उपोषण : भुजबळ
जरांगे यांनी आरक्षणाचे श्रेय मिळविण्यासाठी उपोषण चालवले असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका, असा सल्ला जरांगे यांना दिला आहे. मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, येत्या 20 तारखेला विधिमंडळाचे अधिवेशन होणार यात शंका नाही. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास सरकार वचनबद्ध आहे. कोणाला वाटले म्हणून अधिवेशन झटपट घेता येत नाही. त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते.
हेही वाचा :
अखेर जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला, या निर्णयानंतर उपोषण…
हिंगोली : जरांगे-पाटलांना पाठिंबा देण्यासाठी गोरेगावात कडकडीत बंद
जरांगेंना नारायणगडच्या मठाधिपतींकडून बळजबरीने पाणी पाजण्याचा प्रयत्न, पण…
Latest Marathi News मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू; मागण्यांवर ठाम Brought to You By : Bharat Live News Media.
