रायगड : बलात्कार करून अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल

महाड; पुढारी वृत्तसेवा : सहा वर्षांपासून सातत्याने महिलेवर बलात्कार करून पीडितेचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने महाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार महिलेवर 2018 पासून मुख्य आरोपीद्वारे बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  मोबाईलवर … The post रायगड : बलात्कार करून अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

रायगड : बलात्कार करून अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल

महाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : सहा वर्षांपासून सातत्याने महिलेवर बलात्कार करून पीडितेचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने महाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार महिलेवर 2018 पासून मुख्य आरोपीद्वारे बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  मोबाईलवर पीडित अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या अश्लील फोटो आणि व्हिडिओंची धमकी देत त्या बदल्यात पैशाची मागणी करीत त्यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत बुधवारी (दि. १४) सायंकाळी पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुख्य आरोपी इमरान इब्राहिम अंतुले राहणार चांढवे (महाड, रायगड) यांच्यासह सनाउल्ला पोरे, अयनान सनाउल्ला पोरे (दोघेही रा. गोरेगाव, माणगाव – रायगड), मैनुद्दीन हिदायत ढोकले (रा. लाडवली, मोहल्ला महाड रायगड) आणि अकील अफसर फामे (रा. महाड, रायगड) अशा पाच जणांवर भादवि कलम 376,2(एन),342,354 (अ)(एक)(दोन), 354,354(ड),384,385,506,34 त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी करीत आहेत.
Latest Marathi News रायगड : बलात्कार करून अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.