कोल्हापूर : पेठवडगावात बंद घराचे कुलुप तोडून आठ लाखांचा ऐवज लंपास

किणी; पुढारी वृत्तसेवा : पेठवडगावातील रामनगर येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे आठ लाखाचा ऐवज आज (दि.१५)  अज्ञात चोरट्यानी लंपास केला. याबाबत रोहन मल्लिकार्जुन पिसे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रामनगर येथील गल्ली क्रमांक दोन येथे रोहन पिसे हे राहतात. ते मंगळवारी आपल्या आईसह … The post कोल्हापूर : पेठवडगावात बंद घराचे कुलुप तोडून आठ लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

कोल्हापूर : पेठवडगावात बंद घराचे कुलुप तोडून आठ लाखांचा ऐवज लंपास

किणी; Bharat Live News Media वृत्तसेवा : पेठवडगावातील रामनगर येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे आठ लाखाचा ऐवज आज (दि.१५)  अज्ञात चोरट्यानी लंपास केला. याबाबत रोहन मल्लिकार्जुन पिसे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
रामनगर येथील गल्ली क्रमांक दोन येथे रोहन पिसे हे राहतात. ते मंगळवारी आपल्या आईसह नागपूर येथे कामानिमित्त गेले होते. आज (दि.१५) नागपुरहुन परत आले असता दरवाजाचे कुलुप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात जाऊन पाहिले असता लाकडी कापटाचे लॉक उचकटून आतील साहित्य विस्कटले होते. कपाटाच्या लॉकरमध्ये ३८ ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, ३७ ग्रॅमचे व २० ग्रॅमचे दोन नेकलेस, २० ग्रॅमची चेन, १५ ग्रॅमचे मिनी गंठन, ५ ग्रॅमचे मिनी मंगळसुत्र, ८ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स असा १५ तोळ्याहून अधिक वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह वीस हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पिसे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पंचनामा करून ठसे तज्ञ व श्वानपथकास पाचारण केले. मात्र चोरट्यांचा सुगावा लागू शकला नाही. या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असुन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीष शिंदे अधिक तपास करत आहेत. दरम्यान गेल्या दोन वर्षात घरफोडीच्या पेठवडगावात चोरीच्या अनेक घटना घडल्या असून एकाही चोरीच्या घटनेचा छडा लागला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा :

अखेर जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला, या निर्णयानंतर उपोषण…
NCP MLA Disqualification Case : शरद पवारांच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली असतानाही निर्णय : जयंत पाटील
Muralidhar Jadhav : कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग; मुरलीधर जाधवांचा ठाकरे गटाचा राजीनामा

Latest Marathi News कोल्हापूर : पेठवडगावात बंद घराचे कुलुप तोडून आठ लाखांचा ऐवज लंपास Brought to You By : Bharat Live News Media.