१५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात

नाशिक : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. रामनाथ उमाजी देवडे असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार हे जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष असून, त्यांना शासकीय निधीतून सात लाख ३० हजार रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून शाळेचे सुशोभीकरण, परसबागचे … The post १५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात appeared first on पुढारी.

१५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात

नाशिक : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. रामनाथ उमाजी देवडे असे संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार हे जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष असून, त्यांना शासकीय निधीतून सात लाख ३० हजार रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून शाळेचे सुशोभीकरण, परसबागचे काम केले जात आहे. येवला तालुक्यातील चिंचोडी, खुद्र बापूर ग्रुप ग्रामपंचायतचा सदस्य देवडे याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचला. पंचासमोर देवडे याने तडजोड करीत १५ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने त्यास पकडले. त्याच्याविरोधात येवला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा
जलयुक्त’ रुतले प्रशासकीय गाळात !

Latest Marathi News १५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.