धूम्रपान करताना पकडलं, भीतीपोटी विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- तिडके कॉलनी परिसरातील एका शाळेच्या इमारतीवरून आठवीतील विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुदैवाने विद्यार्थिनीस गंभीर दुखापत झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी धूम्रपान करत असताना तिला शालेय व्यवस्थापनाने पाहिल्यानंतर भीतीपोटी तिने इमारतीवरून उडी मारल्याचे समजते.
उडी मारणारी १५ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे. गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. तिला शाळेच्या परिसरात धूम्रपान करताना शालेय व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्याने पाहिले. आपली तक्रार होईल, या भीतीने ती विद्यार्थिनी घाबरली. त्यानंतर काही क्षणात तिने शाळेच्या इमारतीवरून उडी मारली. यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
गद्दार मंत्र्याची सात वाजेनंतर परिस्थिती गंभीर असते, आदित्य ठाकरेंचा कुणाला टोला?
Yodha Poster : १३ हजार फुटांवर फडकावलं Yodha Poster, सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ने केलं रेकॉर्ड
Nashik Crime News : म्हसरूळ परिसरातील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त
Latest Marathi News धूम्रपान करताना पकडलं, भीतीपोटी विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी Brought to You By : Bharat Live News Media.
