अखेर जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला, या निर्णयानंतर उपोषण…

पुढारी ऑनलाईन डेस्क : जरांगे पाटील हे सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पाठपुराव्याकरिता अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणास बसलेले आहेत. त्यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अन्नत्याग करत उपोषण सुरु ठेवले आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र आज (दि. १५) सायंकाळी समाज बांधवाच्या अग्रहास्तव एक ग्लास पाणी घेतले. मात्र उपोषण सुरुच ठेवणार असल्याच्या भुमिकेवर जरांगे-पाटील … The post अखेर जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला, या निर्णयानंतर उपोषण… appeared first on पुढारी.

अखेर जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला, या निर्णयानंतर उपोषण…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जरांगे पाटील हे सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पाठपुराव्याकरिता अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणास बसलेले आहेत. त्यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अन्नत्याग करत उपोषण सुरु ठेवले आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र आज (दि. १५) सायंकाळी समाज बांधवाच्या अग्रहास्तव एक ग्लास पाणी घेतले. मात्र उपोषण सुरुच ठेवणार असल्याच्या भुमिकेवर जरांगे-पाटील ठाम आहेत.
समाज बांधवांकडून उपचार घेण्याचा आग्रह करत असताना दादा उपचार घ्या… उपचार घ्या.. अशा घोषणा देण्यात येत होत्या. बऱ्याचदा मनोज जरांगे यांनी उपस्थितांना सुनावले देखील होते. तुम्ही आग्रह करू नका, तुम्ही हट्ट करू नका, तुम्ही जितके हट्टी आहात तितकाच मी जिद्दी आहे, हे तुम्हालाही माहिती आहे असे म्हणत जरांगे पाटील आपल्या भुमिकेवर ठाम होते. हट्ट सोडा, मात्र समाज बांधव ऐकत नसल्याने अखेर मनोज जरांगे यांनी दोन घोट पाणी पितो पण उपचाराचा हट्ट करू नका असे सांगितले. या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी अर्धा ग्लास प्यायले. त्यांच्या या निर्णयानंतर मराठा समाज बांधव शांत झाला.
Latest Marathi News अखेर जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला, या निर्णयानंतर उपोषण… Brought to You By : Bharat Live News Media.