सांगली : मराठा आरक्षणास पाठिंब्यासाठी कवठेमहांकाळ कडकडीत बंद

कवठेमहांकाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज (दि. १५) कवठेमहांकाळ शहरांमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सकल मराठा समाज कवठेमहांकाळ निवासी नायब तहसिलदार संजय पवार यांना या उपोषणाबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेले सर्व जीआर पारीत करावेत या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे चालु असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणास कवठेमहांकाळमधून मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात येणार आहे. आज (दि. १५) कवठेमहांकाळ तालुका बंद ठेवून उपोषणास पाठिंबा देत असल्याचे सांगितले. तरी महाराष्ट्र शासनाने ताबडतोब सगेसोयरे व सर्व जीआर विशेष अधिवेशनामध्ये वरील विषय पारीत करावेत व मराठा समाजाला न्याय देण्याची भुमिका महाराष्ट्र शासनाने घ्यावी.
Latest Marathi News सांगली : मराठा आरक्षणास पाठिंब्यासाठी कवठेमहांकाळ कडकडीत बंद Brought to You By : Bharat Live News Media.
