कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग; मुरलीधर जाधवांचा ठाकरे गटाचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर जाधव यांनी स्वत: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेनेमधील बंडखोरीनंतर ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी … The post कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग; मुरलीधर जाधवांचा ठाकरे गटाचा राजीनामा appeared first on पुढारी.

कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग; मुरलीधर जाधवांचा ठाकरे गटाचा राजीनामा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर जाधव यांनी स्वत: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
शिवसेनेमधील बंडखोरीनंतर ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीवरून कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी दर्शवल्याने त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. यानेही नाराजीनंतर जाधव वेगळी भूमिका घेणार असल्याच्या चर्चा होत्या. आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असून येत्या दोन दिवसात पुढील दिशा स्पष्ट करतील असा अंदाज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा

Muralidhar Jadhav : शिवसेना- ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावरून मुरलीधर जाधव यांची हकालपट्टी
NCP MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरण : राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच : विधानसभा अध्‍यक्ष नार्वेकरांचा निर्वाळा

Latest Marathi News कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग; मुरलीधर जाधवांचा ठाकरे गटाचा राजीनामा Brought to You By : Bharat Live News Media.