‘राष्ट्रवादी’बाबतच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी आज पार पडली. राष्ट्रवादी ही अजित पवार गटाचीच असल्याचा निर्णय विधान सभा अध्यक्षांनी दिला आहे. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी हा निकाल कॉपी पेस्ट निकाल असल्याची प्रतिक्रिया दिली. या निकालामुळे मला कोणताही धक्का किंवा आश्चर्य बसलेलं नाही अशी असंही सुळे म्हाणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल देखील सुळे यांनी उपस्थित केला. कायदे मोडूनच सध्या काम सुरु आहे. कोणत्या पक्षात दडपशाही सुरु आहे हे जनतेला माहित आहे. आजचा निर्णय हा पूर्णपणे कॉपी पेस्ट असल्याचे सुळे म्हणाल्या. अदृश्य शक्तीच्या आदेशाववरुन हा निकाल देण्यात आला आहे.
Latest Marathi News ‘राष्ट्रवादी’बाबतच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या.. Brought to You By : Bharat Live News Media.
