
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज ‘व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजेच प्रेमाचा दिवस’ या दिवशी चित्रपट ‘ऊन सावली’ चे पहिले गाणे टायटल सॉन्ग आज अल्ट्रा म्युजिक कंपनीद्वारा लाँच करण्यात आले. ‘ऊन सावली तू माझी ऊन सावली, आली कशी प्रीत मनी झूर बावरी…’ असे ह्या गाण्याचे बोल आहेत. प्रेमाचा आगळा वेगळा आनंद प्रेक्षकांना हळूच स्पर्श करणारा असा हा चित्रपट आहे.
संबंधित बातम्या –
Yodha Poster : १३ हजार फुटांवर फडकावलं Yodha Poster, सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ने केलं रेकॉर्ड
K L Rahul-Athiya Shetty : के एल राहुलसोबत अथिया शेट्टी आफ्रिकेच्या जंगल सफारीवर
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा व्हॅलेंटाईन डेला असाही स्टंट
‘ऊन सावली’ या चित्रपटामध्ये प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा आहे. प्रणयला लग्न करायचं नाही आणि दुसरीकडे अन्वीला लग्न करायचं नाही पण हे ती तिच्या आईला सांगू शकत नाही म्हणून ते दोघेही त्यांच्या पालकांच्या मनाचा विचार करता लग्नाला होकार देतात. आणि एक दिवस असा क्षण येतो जेव्हा आन्वी आणि प्रणय त्यांच्या कुटुंबियांसोबत एकमेकांना भेटतात. प्रणयला पहिल्या नजरेतच आन्वी आवडते. परंतु आन्वीचा विरोध हा कायम आहे.
‘व्हॅलेन्टाईन्स डे’ च्या दिवशी ‘ऊन सावली’ ह्या चित्रपटाचे टायटल सॉन्ग नकुल देशमुख आणि श्रिया जैन यांनी गायले आहे. अल्ट्रा म्युझिकद्वारा लाँच करण्यात आले आहे. गाणे येताच प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
तिकीट विंडो पिक्चर्स बॅनर अंतर्गत समीर शेख द्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा अभय वर्धन यांनी लिहिली आहे. तसेच निर्देशन दिवाकर नाईक यांनी केले आहे. चित्रपटामध्ये म्युझिक सार्थक नकुल यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच नकुल देशमुख आणि श्रिया जैन यांनी हे गाणे गायले आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तसेच अजिंक्य ननवरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम यांचा देखील समावेश आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिले गाणे एवढे हिट झाले आहे की, चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Latest Marathi News भूषण प्रधान-शिवानी सुर्वे यांच्या ‘ऊन सावली’ चित्रपटाचे टायटल सॉंग रिलीज Brought to You By : Bharat Live News Media.
