
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्राचा महत्त्वाचा चित्रपट ‘योद्धा’ चे पोस्टर युनिक स्टाईलमध्ये रिलीज करण्यात आला आहे. (Yodha Poster) या चित्रपटाच्या पोस्टरला १३ हजार फूट उंचीवरून दुबईमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. (Yodha Poster)
संबंधित बातम्या –
K L Rahul-Athiya Shetty : के एल राहुलसोबत अथिया शेट्टी आफ्रिकेच्या जंगल सफारीवर
Shivrayancha Chhava : भव्य ऐतिहासिकपट ‘शिवरायांचा छावा’ उद्या चित्रपटगृहात
Poonam Pandey : IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडे
चित्रपटाच्या एका व्हिडिओमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, कशाप्रकारे आकाशात १३ हजार फूट उंचीवर चित्रपटाचे पोस्टर फडकवण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, काही लोक पोस्टर विमानाच्या आत घेऊन जाताना दिसत आहेत. मग पोस्टर घेऊन विमातातून एकदम बाहेर उडी मारतात. यानंतर पोस्टर उघडते आणि सिद्धार्थचा लूक दिसतो.
नव्या पोस्टरसोबत सिद्धार्थ मल्होत्राने चित्रपटाच्या टीजरची घोषणादेखील केली आहे. १९ फेब्रुवारी रोजी चित्रपटाचे टीजर जारी करण्यात आले आहे. सिद्धार्थची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. पोस्टवर कॉमेंट्सचा पूर आला आहे. १३ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होईल.
या चित्रपटात एक अशा योद्ध्याची कहाणी दाखवण्यात आली आहे, जो एअरप्लेन हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लढतो आणि विमानात उपस्थित असलेल्या सर्व पॅसेंजरना सुरक्षित परत आणतो. योद्धाच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा दिसेल, तो एका सोल्जरच्या भूमिकेत असेल.
View this post on Instagram
A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)
Latest Marathi News १३ हजार फुटांवर फडकावलं Yodha Poster, सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ने केलं रेकॉर्ड Brought to You By : Bharat Live News Media.
