Crime News : बनावट सोने देऊन सराफाचीच फसवणूक

नगर : पुढारी वृत्तसेवा :  केडगाव उपनगरातील एका सराफ व्यावसायिकाला परप्रांतीयांनी मोडीसाठी बनावट सोने देऊन 45 हजार 926 रुपयांना गंडविले. ही घटना सोमवारी सकाळी घडली.प्रमोद गोपा व मुकेश गोपा यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुकेश मधुकर दहिवाळ (रा. सचिननगर, केडगाव, नगर) यांनी फिर्यादीत म्हटले, केडगाव येथील एका रिक्षा चालकांच्या ओळखीने दोन जण दुकानात … The post Crime News : बनावट सोने देऊन सराफाचीच फसवणूक appeared first on पुढारी.

Crime News : बनावट सोने देऊन सराफाचीच फसवणूक

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  केडगाव उपनगरातील एका सराफ व्यावसायिकाला परप्रांतीयांनी मोडीसाठी बनावट सोने देऊन 45 हजार 926 रुपयांना गंडविले. ही घटना सोमवारी सकाळी घडली.प्रमोद गोपा व मुकेश गोपा यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुकेश मधुकर दहिवाळ (रा. सचिननगर, केडगाव, नगर) यांनी फिर्यादीत म्हटले, केडगाव येथील एका रिक्षा चालकांच्या ओळखीने दोन जण दुकानात आले. त्यांनी सोन्याची अंगठी मोडायची असे सांगितले. त्यांना त्याची पावती मागितली. पावती नसल्याने ते परत गेलेे.
दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा आले आणि मोबाईलमध्ये सोन्याची पावती दाखविली. मोडीचे 79 हजार 900 रुपये होतील असे सांगितले. त्यांनी त्या बदल्यात सोन्याच्या वस्तू मागितल्या. एकूण 45 हजार 926 रूपयांचे सोने-चांदीचे दागिने नेले. मंगळवारी दुपारी ते दागिने काम करण्यासाठी घेतले. ते गरम केले असता पांढरे पडू लागले. ते सोने नसून चांदी असल्याचे लक्षात आले. त्याला सोन्याचा फक्त मुलामा होता. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
Latest Marathi News Crime News : बनावट सोने देऊन सराफाचीच फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.