शेतकरी रस्त्यावर मात्र सरकार तोडाफोडी मध्ये व्यस्त

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा– देश आणि सरकार त्यांच्या हातातून निसटत आहे. तेव्हा भाजपाला चार जाती आठवल्या आहेत. जिथे भाजपा किंवा भाजपा प्रणित सरकार आहे तेथे अस्थिर सरकार आहे. 370 चे कलम हटवण्यासाठी ऊबाठा शिवसेनेने सुद्धा पाठिंबा दिलेला होता. मात्र आजही कश्मीरमध्ये कश्मीरी पंडित जाऊ शकलेले नाही. दिल्लीला सैन्याचा गराडा पडलेला आहे. हा गराडा आतंकवादी किंवा माववादींना अडवण्यासाठी नव्हे तर देशाचा अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याला अडवण्यासाठी हा वेढा पडलेला आहे. असा टोला आमदार आदित्य ठाकरे यांनी जळगाव येथे घेतलेल्या सुभाष चौकातील सभेत लगावला. ही सभा नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने सुरू झाली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा आज जळगाव शहरातील सुभाष चौकात होती. ही सभा अकरा वाजता सुरू होणार होती मात्र आमदार आदित्य ठाकरे यांना जवळपास तीन तास उशिरा शहरात दाखल झाल्यामुळे ही सभा दुपारी दोन वाजेला सुरू झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर जयश्री महाजन, शरद तायडे, वरून सरदेसाई, डॉक्टर माने, जळगाव जिल्ह्यातील संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उपस्थित होते. या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांची अनुपस्थिती दिसली. आमदार आदित्य ठाकरे हे उशिराने आल्याने महाविकास आघाडीची होणारी बैठक सुद्धा रद्द झाली.
यावेळी सभेला संबोधताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, जो उत्साह मला दिसला आहे यावरून खात्री पटली की, मला प्रचाराला येण्याची गरज पडणार नाही. विजयाच्या सभेलाच यावे लागेल. भाजपा सरकारच्या काळात तरुण, शेतकरी सगळेच अस्वस्थ आहेत. शेतकरी, गरीब चिंतेत, महिला असुरक्षित असल्याची टीका त्यांनी केली.
आता देशात बिकट परिस्थिती झालेली आहे. दिल्लीत सैन्याचा गराडा पडलेला आहे. शेतकऱ्यांना आडविण्यासाठी कॉंक्रिटी खिळे, वायरी टाकण्यात येत आहे. जो अन्नदाता आहे त्यांना अतिरेक्यासारखी वागणूक दिली जात आहे.
ज्या स्वामीनाथन यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला. त्या व्यक्तीचे तरी ऐकायला पाहिजे होते मात्र त्या शेतकऱ्यांना हे सरकार लाठीमार करीत असल्याचे ते म्हणाले. असाच दीड वर्षांपूर्वी मोर्चा गेला होता व त्यावेळेस यांनी अन्नदात्यावर लाठीमार केल्याचे ते म्हणाले. राम मंदिर बनल्यावर राम राज्य येणार असल्याचे हे सरकार म्हणत होते मात्र राम मंदिर झाल्यावरही अजूनही रामराज्य आलेले नाही आणि लाठीमार करून रामराज्य येणार नाही. भाजपा शेतकऱ्यांना माओवादी व नक्षलवादी म्हणत आहेत असा आरोप त्यांनी केला.
आपण केंद्र सरकारला राज्यातून जीएसटी टॅक्स व इतर टॅक्स मोठ्या प्रमाणात देत असतो मात्र त्यांनी किंवा त्यांना हे विचारले पाहिजे की त्यांनी किती राज्य सरकारला परत दिला आहे. याचा विचार करणे काळाची गरज आहे. मात्र हे खोक्यांचे सरकार व त्यांचे मुख्यमंत्री हे दिल्लीला लोटांगण घालणारे आहेत. ओके मंत्री, चिंधीचोर सरकारमध्ये यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे. त्यांना त्यांचे पैसे मिळाले तर राज्याचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला पाहिजे.
ठोके व धोक्यासाठी मदत झालेली आहे. राज्यासाठी कधी मदत होणार व हक्काचे पैसे आहे. आज किंवा भविष्यात शेतकरी होण्याची इच्छा युवकांमध्ये राहिलेली नाही कारण शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाहीये. केळी पीक विम्याचे पैसे अजूनही मिळाले नाही. शेतकऱ्यांना रात्री लाईट मिळते. शेतकऱ्याची पुढची पिढी शेतीकडे वळण्यास तयार नाही. गेल्या दोन वर्षात या सरकारकडे खोके पोचले आहेत. एकही पैसा दोन वर्षात पोचलेला नाही किंवा मदत मिळाली नाही. पंचनामे व जीओ ट्रेकिंग झालेली आहे पण मदत होत नाही दोन वर्षांमध्ये राज्यात कोणतेही उद्योग आले नाही अशी टीका त्यांनी केली.
वेदांत फक सारखी कंपनी निघून गेली राज्यात घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना हे माहितीच नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री यांच्या काळात 6500 कोटीची कामे काढली मात्र या सरकारने दोन वर्ष ती बंद पडली वेदांत फॉक्स मुळे एक लाख तरुणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या मात्र केंद्र सरकारला हे दिसलं की महाराष्ट्र कुठे जाते त्यांनी गुजरातला घेऊन गेले मात्र तेथेही तो उद्योग उभारावर न शकल्यामुळे आज ती कंपनी देशाबाहेर गेलेली आहेत यामुळे देशाचे व तरुणां पिढीचे नुकसान झालेले आहेत
यावेळी पेपर फुटी वर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की नोकर भरतीसाठी लाखो विद्यार्थी तयारी करीत असतात. मात्र पेपर फुटतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या तरुणांना शब्द देतात की 2024 मध्ये सरकार बनल्यानंतर असा कायदा करू वैगेरे. जातीला पोट असते पोटाला जात लावू नका अशी टीका करत महागाई गगनाला भिडलेली असून अच्छे दिन अद्याप आले नसल्याची टीका केली.
हे गुन्हेगारांचे सरकार आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होतो. चोरट्यांचे सरकार आहे. पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे मागत आहे. असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना सलाम करावा लागत आहे. गुन्हे किंवा कोणतेही दाग असो भाजपा प्रवेश केल्यानंतर धूवून निघतात हे चित्र भयावह आहे. नाय हक्कासाठी लढत आहोत. इन्कम टॅक्स चौकश्या मागे लावले जातात. पत्रकारांचा आवाज दाबला जातो आहे. हे संविधानाचे चित्र नाही लोकशाहीची चिन्ह नाही. जो विरोधात बोलतो त्याला जेलमध्ये टाकले जाते आहे. संधी मिळाल्यास हे संविधान देखील बदलतील असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला. राज्यात सुवर्णकाळ आणायचा असेल तर संघटित राहावे लागले असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
हेही वाचा :
Death of a shark : शवविच्छेदनात ‘त्या’ शार्क माशाच्या पोटात आढळली पंधरा पिल्ले, प्रत्येक पिल्लाचे वजन पाच किलोपेक्षा अधिक
Nashik Leopard News : कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं…
Latest Marathi News शेतकरी रस्त्यावर मात्र सरकार तोडाफोडी मध्ये व्यस्त Brought to You By : Bharat Live News Media.
