नगरमध्ये 47 घरांचे नळ कनेक्शन बंद

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाने कर वसुलीसाठी आता ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. थकीत मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा, वारंट नोटिसा, मालमत्ता जप्त, नळ कनेक्शन बंद अशी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत चार मालमत्ता जप्त केल्या असून, दोन दिवसांत 47 जणांचे नळकनेक्शन बंद केले असून, चार थकबाकीदारांची मालमत्ता जप्त केली.
ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत कर वसुलीत दिरंगाईत होत असल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या उपायुक्तांना कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत.
महापालिकेची मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा थकीत कर 205 कोटींचा आहे. वारंवार आवाहन करूनही थकबाकीदार कर भरण्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यासाठी आता बड्या थकबाकीदारांची नावे चौका-चौकात जाहीररित्या फलकावर झळकविण्यात आली आहे. कर वसुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी प्रत्येक विभागाला उपायुक्तांची नेमणूक केली. गेल्या आठवड्यात उपायुक्त सचिन बांगर यांनी कर निरीक्षकांची बैठक घेऊन त्यांना टार्गेट दिले. दररोज पाच मालमत्ता जप्त करा व पाच नळकनेक्शन तोडा असे आदेश कर निरीक्षकांना दिले होते.
दरम्यान, वसुलीत दिरंगाई होत असल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी चार विभागाच्या उपायुक्तांना कर वसुलीबाबत कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या. त्यामुळे आता कर वसुलीला गती आली आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी एका दिवसांत सुमारे 9 लाख 27 हजार 978 हजार वसुली झाली. प्रभाग समिती दोनमध्ये कर न भरल्याने तीन मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. तर, 95 हजारांची कर वसुली करण्यात आली. दरम्यान, वसुली विभागाने आतापर्यंत थकीत करापोटी सुमारे 3370 मालमत्ताधारकांना जप्ती पूर्व नोटिस बजाविल्या आहेत. तर, सुमारे 100 मालमत्ताधारकांना वारंट बजावणी करण्यात आली आहे. जप्ती व नळकनेक्शन बंदची सुमारे 51 मालमत्ताधारकांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
एक दिवसाचा भरणा
प्रभाग समिती एक 4,48,120
प्रभाग समिती दोन 2,44,441
प्रभाग समिती तीन 23360
प्रभाग समिती चार 2,12,057
वसुली पथकाची कावाई प्रभाग समिती नळ बंद जप्ती
एक 15 1
दोन 3 2
तीन 19 0
चार 10 1
Latest Marathi News नगरमध्ये 47 घरांचे नळ कनेक्शन बंद Brought to You By : Bharat Live News Media.
