
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती यांनी खासदार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ( TMC MP Mimi Chakraborty announces resignation from party )
मिमी चक्रवर्ती यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत जाधवपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असून, जाधवपूर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवरील पक्षातील नेत्यांवरील नाराजी मुळे मिमी चक्रकवर्ती यांनी हे पाऊल उचलले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान, मिमी चक्रवर्ती त्यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला नसल्याने हा औपचारिक राजीनामा म्हणून गणला जाणार नाही.
TMC MP Mimi Chakraborty resigns from Latest Marathi News of MP. Details awaited. pic.twitter.com/LbTfpQdkxv
— ANI (@ANI) February 15, 2024
Latest Marathi News ‘तृणमूल’च्या मिमी चक्रवर्ती यांनी दिला खासदार पदाचा राजीनामा Brought to You By : Bharat Live News Media.
