INDIA आघाडीला आणखी एक धक्का; फारूक अब्दुल्ला स्वतंत्र लढणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला एका मागून एक मोठे धक्के बसत आहेत. काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरमधील निवडणुका स्वतंत्र लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. फारुख अब्दुल्ला हे इंडिया आघाडीचे सर्वात विश्वासू भागीदार होते. तसेच अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हा देखील आघाडीचा महत्त्वाचा भाग होता. परंतु, अब्दुल्ला यांच्या निर्णयाने INDIA आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. (Farooq Abdullah)
नॅशनल कॉन्फरन्स एकट्यानेच लढेल, यात शंका नाही- फारूक अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरमधील निवडणुका आणि जागावाटपावर बोलताना शनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला म्हणाले की, “मला वाटते की दोन्ही राज्यांतील निवडणुका संसदीय निवडणुकांसोबतच होतील. जागावाटपाचा प्रश्न आहे, तर नॅशनल कॉन्फरन्स हा एकट्यानेच लढेल आणि यात शंका नाही, असे त्यांनी श्रीनगर येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Farooq Abdullah)
#WATCH | Srinagar: On elections in J&K and seat sharing, National Conference Chief Farooq Abdullah says, “I think that elections in both states will be held with the Parliamentary elections. As far as seat sharing is concerned, NC will contest alone and there’s no doubt about… pic.twitter.com/e2pLpX3YVB
— ANI (@ANI) February 15, 2024
Farooq Abdullah : यापूर्वी ‘या’ पक्षांनीदेखील जाहीर केली रणनिती
यापूर्वी इंडिया आघाडीचा भाग असलेले आणि सध्या बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार यांनीदेखील आघाडीशी फारकत घेत, भाजपला साथ दिली. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. AAP आणि काँग्रेसने देखील आधीच जाहीर केले आहे की, ते पंजाबमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका एकट्याने लढतील. कारण त्यांचे राज्यातील स्थानिक नेते आघाडीच्या बाजूने नाहीत. ‘आप’कडून जागावाटपाचा प्रस्ताव जाहीर करताना पाठक म्हणाले की, दिल्लीत लोकसभेच्या सातपैकी सहा जागा लढवण्याचा आणि एक काँग्रेसला देण्याची त्यांची योजना आहे. (Farooq Abdullah)
हेही वाचा:
Pakistan Elections 2024 : पाकिस्तान पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच कायम; दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल
‘काही गोष्टी गुलदस्त्यातच…’ प्रफुल्ल पटेलांनी सांगितले खासदारकी असतानाही का भरला अर्ज?
Rohit Sharma Century : कॅप्टन इनिंग..! राजकोट कसोटीत रोहीत शर्माचे दमदार शतक
Latest Marathi News INDIA आघाडीला आणखी एक धक्का; फारूक अब्दुल्ला स्वतंत्र लढणार Brought to You By : Bharat Live News Media.
