भव्य ऐतिहासिकपट ‘शिवरायांचा छावा’ उद्या चित्रपटगृहात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्वराज्य रक्षणार्थ अनंत अत्याचार सोसत बलिदान देणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारीला रिलीज होतोय. (Shivrayancha Chhava) दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा भव्य ऐतिहासिकपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. (Shivrayancha Chhava)
संबंधित बातम्या –
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा व्हॅलेंटाईन डेला असाही स्टंट
‘फतवा’ फेम प्रतिक गौतम-श्रद्धा भगतचं ‘चोरू चोरून’ गाणं पाहिलं का?
Joker 2 New Look : जोकिन फीनिक्स-लेडी गागाचे फोटो येताच धुमाकूळ
स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्ध्याची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात घडणार आहे.
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे, अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे आदी कलाकारांच्या भूमिका ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात आहेत.
मल्हार पिक्चर्स कं. चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे.
पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे.
कला-प्रतीक रेडीज, वेशभूषा-हितेंद्र कापोपारा, रंगभूषा-केशभूषा-शैलेश केसकर, साहसदृश्ये-बब्बू खन्ना, नृत्य दिग्दर्शक-विष्णु देवा, किरण बोरकर, ध्वनिमुद्रन/साउंड डिझाईन-निखिल लांजेकर यांचे आहे.
View this post on Instagram
A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)
View this post on Instagram
A post shared by Shivrayancha Chhava 𝙊𝙛𝙛𝙞𝙘𝙞𝙖𝙡 𝙋𝙖𝙜𝙚 (@shivrayanchachhava)
Latest Marathi News भव्य ऐतिहासिकपट ‘शिवरायांचा छावा’ उद्या चित्रपटगृहात Brought to You By : Bharat Live News Media.
