Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा व्हॅलेंटाईन डेला असाही स्टंट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” च्या रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ने भन्नाट ब्रोमान्स साजरा करत खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची ऑन-स्क्रीन डायनॅमिक केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस तर उतरतेच. पण, ऑफस्क्रिनही धम्माल मस्ती सुरू असल्याचे दिसते.
संबंधित बातम्या-
Joker 2 New Look : जोकिन फीनिक्स-लेडी गागाचे फोटो येताच धुमाकूळ
Poonam Pandey : IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडे
Gharo Ghari Matichya Chuli : रेश्मा शिंदेसोबत झळकणारी ‘ही’ बालकलाकार आहे तरी कोण?
या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे काही ब्रोमन्स फोटो शेअर केले आहेत. त्यांनी फोटोला कॅप्शन लिहित म्हटले आहे- “या व्हॅलेंटाईन डेवर रोमान्सपेक्षा ब्रोमान्स 🤜🤛 #BadeMiyanChoteMiyan #ValentinesDay #BadeMiyanChoteMiyanOnEid2024”
ईदच्या निमित्ताने २०२४ मध्ये बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपट रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)
ॲक्शन सुपरस्टार या थरारक प्रवास सुरू होत असताना चाहत्यांना खिलाडी कुमार आणि बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांच्यातील ॲक्शन आणि सौहार्दाचा रोलरकोस्टर राईड दिसणार आहे. अली अब्बास जफर यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला आणि पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली निर्मिती झाली आहे.
Latest Marathi News Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा व्हॅलेंटाईन डेला असाही स्टंट Brought to You By : Bharat Live News Media.
