खैराची अवैध वाहतूक करणारे दोघे गजाआड

पनवेल; विक्रम बाबर : वापीवरून चिपळूण येथे अवैध पद्धतीने खैराच्या झाडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह कोट्यवधी रुपयांची खैराची झाडे पनवेल वन विभागाने जप्त केली. वन विभागाची ही मोठी कारवाई मानली जात आहे. जवळपास १० ते १५ टन खैराची झाडे असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे.
ही कारवाई बुधवारी उशिरा रात्री मुंबई रोडवर कळंबोली सर्कल जवळ केल्याचे सांगितले जात आहे. मुद्देमालासह दोन संशयीत आरोपींना वन वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :
पनवेलमधील बेपत्ता मुली नवी दिल्लीत
सायबर गुन्हेगारीसाठी वापर; प्रोटॉन मेलवर भारतात बंदीची शक्यता
दुर्दैवी ! तारेला डंपरचा स्पर्श; चालकाचा मृत्यू
Latest Marathi News खैराची अवैध वाहतूक करणारे दोघे गजाआड Brought to You By : Bharat Live News Media.
