GDP घसरला; ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी अधिकृतपणे जाहीर

Bharat Live News Media ऑनलाईन : ब्रिटनमध्ये मंदीचे सावट आणखी गडद झाले आहे. जीडीपीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त घसरण झाल्यामुळे ब्रिटनमध्ये अधिकृतपणे मंदीमध्ये प्रवेश केला आहे. मंदीची व्याख्या सलग दोन- तीन महिन्यांच्या कालावधीत केली जाते जिथे अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी आकुंचन पावते. ब्रिटनमधील सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ०.३ टक्क्यांनी घट झाली आहे, असे ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) आकडेवारीतून दिसून आले आहे. (UK recession)
जीडीपीमधील ही घसरण अपेक्षेपेक्षा जास्त आहे. कारण अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्था ०.१ टक्के संकुचित होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. नुकत्याच झालेल्या रॉयटर्सच्या अर्थशास्त्रज्ञांच्या सर्वेक्षणात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ०.१ टक्क्यांनी कमी घसरणीचा अंदाज वर्तवला होता.
ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीत असल्याने पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला जवळपास दोन वर्षांपासून खीळ बसली आहे. २०२४ मध्ये बँक ऑफ इंग्लंडने अर्थव्यवस्थेत किंचित सुधारणेची अपेक्षा व्यक्ती केली आहे. (UK recession)
Latest Marathi News GDP घसरला; ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी अधिकृतपणे जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.
