जरांगेंना नारायणगडच्या मठाधिपतींकडून पाणी पाजण्याचा प्रयत्न, पण…

वडीगोद्री; Bharat Live News Media वृत्तसेवा : नारायणगडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना समाजाच्या तीव्र भावना असल्याने बळजबरीने पाणी पाजण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांना दोन घोट पिल्यानंतर प्रचंड त्रास झाला. त्यांच्या तोंडातून ते पाणी बाहेर आले. पोटात आग पडली असे ते पुटपुटत होते.
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज गुरुवारी सहावा दिवस असून त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. “पाटील पाणी तरी घ्या…” अशी आर्त विनवणी आंदोलनक जरांगे यांना करत आहेत. मात्र जरांगे सकाळपासून उठलेले नाहीत. जरांगे यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी १० वाजता आरोग्यपथक आले, मात्र तपासणीसाठी त्यांनी नकार दिला.
Latest Marathi News जरांगेंना नारायणगडच्या मठाधिपतींकडून पाणी पाजण्याचा प्रयत्न, पण… Brought to You By : Bharat Live News Media.
