घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त

इगतपुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा: इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टाके घोटी शिवारातील नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री दिडच्या सुमारास नाशिककडुन मुंबईकडे जाणारा कंटेनर पकडत पोलिसांनी त्यातील २१ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. बुधवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास टाके घोटी शिवारातील महामार्गावर मुंबईकडे गुटखा घेवुन जाणारे कंटेनरची (DD 01 F 9102) स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना माहिती मिळताच पोलीस पथक तैनात करून सापळा रचला. पोलिसांनी कंटेनर थांबवताच चालक आणि त्याचा सहकारी पळुन जाण्याचा प्रयत्न करताच पोलीसांनी त्यांना पकडले. पोलिसांनी कंटेरन तपासला असता त्यात सुगंधित तंबाखू गुटख्याने भरलेल्या गोण्या, विविध बॉक्स असा २५ लाखांचा गुटखा सापडला. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला. पोलिसांनी आरोपी अमृत सिंह (४२, मध्यप्रदेश) व पुनमचंद चौहाण (५२, मध्यप्रदेश) यांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा
30 पेक्षा अधिक गुन्हे असलेला सराईत चोरटा जेरबंद
परभणी : २ हजारांची लाच घेताना महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात
Latest Marathi News घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त Brought to You By : Bharat Live News Media.
