पोलादपूर नजीक टँकरला अपघात चालक बचावला, गुन्हा दाखल

पोलादपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई गावचे हद्दीत गोवा बाजू कडून मुंबई दिशेने भरधाव जाणारा टँकर लोखंडी बॅरिकेट्स तोडून गटारात कलंडला असल्याची घटना बुधवार रोजी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे.
संबंधित बातम्या
शिरोडा ग्रामपंचायत ग्रामसभा : “छत्रपती शिवाजी महाराज” सभागृह करण्याच्या मागणीला यश
जेजुरी मुख्य मंदिरातील काम प्रगतिपथावर
Arvind Kejriwal vs ED : अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा ‘ईडी’चे समन्स
टँकर चालक नितीशमुनशी भारद्वाज वय 29 रा. उत्तरप्रदेश हा आपल्या ताब्यातील टँकर (एम एच 43 बी जी 2422) मिथेलॉन केमिकल घेऊन गोवा बाजू कडून मुंबई दिशेने असा जात होता.त्याचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्याच्या अति वेगाने महामार्गालगतच्या लोखंडी रेलिंग वर धडक देऊन टँकर महामार्गालगत गटारात कलंडला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती समजतात पोलीस ठाणे अंमलदार पो.ना.विनोद महाडिक, ट्राफिक चे सी.पी. धायगुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक विनोद महाडिक हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.
Latest Marathi News पोलादपूर नजीक टँकरला अपघात चालक बचावला, गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
