तब्येतीसाठी अनुकूल मनुक्याचे पाणी

वॉशिंग्टन : मनुका चावून चावून खाण्याची अनेकांना आवड असते. ध्यानधारणेच्या काही कोर्सेसमध्ये मनुका चावून खाण्याचे अनेक फायदे आवर्जून सांगितले जातात आणि मनुके शरीरातील विषारी घटक बाहेर काढत पोट कसे स्वच्छ करते, हे देखील विशद केले जाते. मनुका खाण्याप्रमाणेच मनुक्याचे पाणी देखील तब्येतीसाठी अतिशय फायदेशीर ठरते, असा निष्कर्ष सध्या एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. मनुकांमध्ये कित्येक … The post तब्येतीसाठी अनुकूल मनुक्याचे पाणी appeared first on पुढारी.

तब्येतीसाठी अनुकूल मनुक्याचे पाणी

वॉशिंग्टन : मनुका चावून चावून खाण्याची अनेकांना आवड असते. ध्यानधारणेच्या काही कोर्सेसमध्ये मनुका चावून खाण्याचे अनेक फायदे आवर्जून सांगितले जातात आणि मनुके शरीरातील विषारी घटक बाहेर काढत पोट कसे स्वच्छ करते, हे देखील विशद केले जाते. मनुका खाण्याप्रमाणेच मनुक्याचे पाणी देखील तब्येतीसाठी अतिशय फायदेशीर ठरते, असा निष्कर्ष सध्या एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.
मनुकांमध्ये कित्येक प्रकारचे पोषक तत्त्वे आणि जीवनसत्त्वे असतात. तसेच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, असे आता स्पष्ट झाले आहे. जर आपण मनुका सातत्याने खात नसलो तरी अगदी त्याच्या पाणी सेवनाने देखील अनेक लाभ होऊ शकतात. मनुकांचे, मनुकाच्या पाण्याचे नियमित सेवन केले तर पचनक्रिया सुधारते, असे आढळून आले आहे.
मनुका पाण्यात मुबलक प्रमाणात अँटी आक्सिडंट असतात आणि ते शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात, त्यात लोह देखील मुबलक प्रमाणात असते. शिवाय, त्याचे रोज सेवन केल्यास अशक्तपणाची समस्या रहात नाही, असे संशोधनातून आढळून आले आहे. मात्र, यावर अद्याप बराच अभ्यास होण्यास वाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आहारात मनुका पाण्याचा समावेश केला तरी मधुमेहींना याचा बराच फायदा होऊ शकतात, असा प्राथमिक होरा आहे. मनुक्यात असलेले अनेक अँटी ऑक्सिडंट रक्तातील साखरेसाठी लाभदायी असतात, हे त्यातील मुख्य कारण आहे. मनुका पाण्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. पोटाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
मनुक्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनास मदत करते. मनुका पाण्याचे सेवन केल्याने सूज येणे, गॅस, अपचन यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. तसेच पोट चांगले साफ होते, असेही सकृतदर्शनी दिसून आले आहे. मनुका पाणी तयार करण्याची प्रक्रिया बरीच सोपी आहे. त्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात मनुका 8 तास भिजवून ठेवून नंतर ते पुन्हा गरम करून घ्यायचे असते. हे पाणी केव्हाही पिता येते. मात्र, दुपारच्या जेवणापूर्वी त्याचे सेवन केल्यास अधिक लाभ होतात, असा होरा आहे.
The post तब्येतीसाठी अनुकूल मनुक्याचे पाणी appeared first on पुढारी.

वॉशिंग्टन : मनुका चावून चावून खाण्याची अनेकांना आवड असते. ध्यानधारणेच्या काही कोर्सेसमध्ये मनुका चावून खाण्याचे अनेक फायदे आवर्जून सांगितले जातात आणि मनुके शरीरातील विषारी घटक बाहेर काढत पोट कसे स्वच्छ करते, हे देखील विशद केले जाते. मनुका खाण्याप्रमाणेच मनुक्याचे पाणी देखील तब्येतीसाठी अतिशय फायदेशीर ठरते, असा निष्कर्ष सध्या एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. मनुकांमध्ये कित्येक …

The post तब्येतीसाठी अनुकूल मनुक्याचे पाणी appeared first on पुढारी.

Go to Source