दुर्दैवी ! तारेला डंपरचा स्पर्श; चालकाचा मृत्यू

पिरंगुट : Bharat Live News Media वृत्तसेवा : महावितरणच्या उच्च दाबाच्या वीजवाहक तारेला हायवा डंपरच्या हौद्याचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसल्याने चालकाचा मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे बुधवारी (दि. 14) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
कुलदीप कुमार वर्मा (वय 30, मूळ रा. झारखंड. सध्या रा. नेरे रस्ता, मारुंजी, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या डंपरचालकाचे नाव आहे.
कुलदीप वर्मा हा बालेवाडी येथून त्याच्या ताब्यातील हायवा डंपर (एमएच 12 व्हीडब्लू 9986) मधून बिल्डींगसाठी मुरूम घेऊन भुकूम येथे गेला होता. तेथून गेलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहक तारेला डंपरचा हौदा लागला. त्यामुळे वीजप्रवाह त्यात उतरला आणि वर्माला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. सहकार्यांनी त्याला तातडीने जवळील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
Latest Marathi News दुर्दैवी ! तारेला डंपरचा स्पर्श; चालकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
