शुक्रवार, शनिवार शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन

मुंबई : शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार, 16 व 17 फेब्रुवारी रोजी होत असून, आगामी निवडणुकांची तयारी हा या अधिवेशनाचा मुख्य विषय असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते व सचिव किरण पावसकर यांनी सांगितले. तीन सत्रांमध्ये होणार्या या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होईल.
संबंधित बातम्या
Arvind Kejriwal vs ED : अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा ‘ईडी’चे समन्स
Gharo Ghari Matichya Chuli : रेश्मा शिंदेसोबत झळकणारी ‘ही’ बालकलाकार आहे तरी कोण?
Maharashtra Politics : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?, आमदार-खासदारांची तातडीची बैठक
पक्षाच्या दृष्टीने महत्वपूर्ण राजकीय ठराव मांडले जातील. राजकीय ठराव दुसर्या सत्रामध्ये मंजूर केले जातील. तिसर्या सत्रामध्येआगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा होईल. खुली चर्चा तिसर्या सत्रात होईल. तिसर्या सत्राच्या समारोपानंतर संध्याकाळी होणार्या जाहीर सभेला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील, असे पावसकर म्हणाले.
Latest Marathi News शुक्रवार, शनिवार शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन Brought to You By : Bharat Live News Media.
