इंडिया आघाडीचा महामेळावा 24 फेब्रुवारीला पुण्यात : प्रशांत जगताप

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : इंडिया आघाडीतील घटकपक्षांचा महामेळावा 24 फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते शरद पवार यांच्या मोदीबागेतील कार्यालयात बुधवारी पक्षाच्या आमदार, खासदार व पदाधिकार्यांची पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
बैठकीत पक्षाचे नवीन नाव व नवीन चिन्हासह आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. लोकसभा निवडणुका इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार असून, या अनुषंगाने शरद पवार यांच्या नेतृत्वात 24 फेब्रुवारी रोजी इंडिया आघाडीचा महामेळावा पुणे शहरात होणार आहे. पुणे शहर, शिरूर आणि बारामती या तीनही मतदारसंघांत मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार या बैठकीत केल्याचे जगताप यांनी सांगितले.
हेही वाचा
MSME Nashik | पतविस्तारातून एमएसएमईवर वित्तसंस्थांचा वाढता आत्मविश्वास
Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टी तेजीनंतर सपाट, Paytm ची घसरण थांबेना
आदित्य ठाकरे : देशात, राज्यात पुन्हा मविआचे सरकार येणार
Latest Marathi News इंडिया आघाडीचा महामेळावा 24 फेब्रुवारीला पुण्यात : प्रशांत जगताप Brought to You By : Bharat Live News Media.
