सेन्सेक्स, निफ्टी तेजीनंतर सपाट, Paytm ची घसरण थांबेना

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी सकाळी सलग तिसऱ्या दिवशी तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात BSE सेन्सेक्सने २५४ अंकांनी वाढून ७२ हजाराला स्पर्श केला. त्यानंतर तो सपाट होत ७१,९०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २१,८५० वर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates) ऑटो, आयटी, मेटल, फार्मा, पीएसयू बँक आणि … The post सेन्सेक्स, निफ्टी तेजीनंतर सपाट, Paytm ची घसरण थांबेना appeared first on पुढारी.

सेन्सेक्स, निफ्टी तेजीनंतर सपाट, Paytm ची घसरण थांबेना

Bharat Live News Media ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी सकाळी सलग तिसऱ्या दिवशी तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात BSE सेन्सेक्सने २५४ अंकांनी वाढून ७२ हजाराला स्पर्श केला. त्यानंतर तो सपाट होत ७१,९०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २१,८५० वर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates)
ऑटो, आयटी, मेटल, फार्मा, पीएसयू बँक आणि रियल्टी क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्सवर एम अँड एम, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, विप्रो, टेक महिंद्रा, टाटा स्टील हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले आहेत. तर ॲक्सिस बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा हे शेअर्स घसरले आहेत.
निफ्टीवर एम अँड एम, ओएनजीसी, बीपीसीएल, पॉवर ग्रिड, कोल इंडिया हे टॉप गेनर्स आहेत. तर ॲक्सिस बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक हे घसरले आहेत.
Paytm shares मध्ये घसरण कायम
डिजिटल पेमेंट फर्म पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला ५ टक्क्यांनी घसरले. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई सुरू केल्यानंतर पेटीएमचे शेअर्स घसरले आहेत. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कडक कारवाई केल्यापासून पेटीएम शेअर्सला अनेकवेळा लोअर सर्किट्स लागले. सकाळी १०.४५ वाजता NSE वर पेटीएमचे शेअर्स (One 97 Communications) ४ टक्क्यांनी घसरून 3२८ रुपयांवर व्यवहार करत होते.
क्षेत्रीय पातळीवर आज सकाळच्या व्यवहारात नफावसुली दिसल्याने बँक निफ्टी काही प्रमाणात खाली आला होता. पण त्यात रिकव्हरी दिसून येत आहे. बँक निफ्टी ४५,९०० जवळ व्यवहार करत आहे. तर निफ्टी आयटी सुमारे ०.६ टक्क्यांनी वाढला आहे. (Stock Market Updates)
जागतिक बाजार
फेडरल रिझर्व्ह अर्थव्यवस्थेचा वेग कमी न करता महागाई कमी करु शकते की नाही यावर गुंतवणूकदारांनी भर दिल्याने काल बुधवारी अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिली. डाऊ जोन्स, नॅसडॅक कंपोझिट आणि S&P ५०० निर्देशांक १ टक्क्यांपर्यंत वाढले. आज सकाळी आशिया-पॅसिफिक बाजारही वधारले. जपानचा निक्केई २२५, ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी २०० आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी १ टक्क्यांपर्यंत वाढला.
हे ही वाचा :

कर्जदारांना ‘ही’ माहिती देणे बँकांना बंधनकारक, जाणून घ्या ‘की-फॅक्ट स्टेटमेंट’विषयी
विदेशी संस्थांची शेअर बाजारात १२ हजार कोटींची गुंतवणूक

 
Latest Marathi News सेन्सेक्स, निफ्टी तेजीनंतर सपाट, Paytm ची घसरण थांबेना Brought to You By : Bharat Live News Media.