Valentine’s Day Special : 38 जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अथर्व अन् अमृताने (नाव बदलले आहे) व्हॅलेंटाईन डेला विवाह नोंदणी कार्यालय गाठले आणि मोठ्या आनंदाने त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या दोघांप्रमाणे बुधवारी (दि.14) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 38 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्नाची रेशीमगाठ बांधली. बुधवारी सकाळपासून विवाह नोंदणी कार्यालयात तरुण जोडपी आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाइकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषेत … The post Valentine’s Day Special : 38 जोडप्यांनी बांधली लग्नगाठ appeared first on पुढारी.
Valentine’s Day Special : 38 जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अथर्व अन् अमृताने (नाव बदलले आहे) व्हॅलेंटाईन डेला विवाह नोंदणी कार्यालय गाठले आणि मोठ्या आनंदाने त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या दोघांप्रमाणे बुधवारी (दि.14) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 38 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्नाची रेशीमगाठ बांधली. बुधवारी सकाळपासून विवाह नोंदणी कार्यालयात तरुण जोडपी आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाइकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न करून बाहेर पडल्यावर आनंद व्यक्त केला. फोटोसेशन केले अन् सेल्फी काढले. आयुष्यभराचा सहवास, प्रेम जोडताना काही जोडपी भावूकही झाली.
दिवसभरात एक-एक करून जोडपी कार्यालयात येत होती अन् सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर अधिकार्‍यांच्या आणि साक्षीदारांच्या साक्षीने अनेकांचे लग्न होत होते. लग्न झाल्यानंतर कार्यालयाबाहेर आल्यानंतर जोडप्यांचा आनंद पाहण्यासारखा होता.
विवाह नोंदणी अधिकारी संगीता जाधव म्हणाल्या, नोंदणी पद्धतीने 38 जोडप्यांनी लग्न झाले. यासाठी त्यांनी पूर्वनोंदणी केली होती.
मागील वर्षी 44 जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. परंतु, यंदा 38 जोडप्यांनी बुधवारी नोंदणी पद्धतीने विवाह केला. यंदा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करणार्‍यांची संख्या कमी झाली आहे.
हेही वाचा

NCP vs NCP crisis : शरद पवार गटाच्या याचिकेवरील सुनावणीस विलंब होण्याची शक्यता
आदित्य ठाकरे : देशात, राज्यात पुन्हा मविआचे सरकार येणार
गांजा तस्करी प्रकरण : इंजिनीअरला बेड्या; गांजासह दोन मोबाईल जप्त

Latest Marathi News Valentine’s Day Special : 38 जोडप्यांनी बांधली लग्नगाठ Brought to You By : Bharat Live News Media.