कारगिल युद्धाचे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आई कमलकांत बत्रा यांचे निधन

Bharat Live News Media ऑनलाईन : कारगिल युद्धाचे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आई आणि आप पक्षाच्या माजी नेत्या कमलकांत बत्रा यांचे हिमाचल प्रदेशमध्ये निधन झाले आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांनी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पालमपूर येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (Kamal Kant Batra Death)
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी X वर पोस्ट करत कमलकांत बत्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या मातोश्री श्रीमती कमलकांत बत्रा यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. शोकाकुल कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो अशी आम्ही प्रार्थना करतो.”
त्यांनी २०१४ मध्ये हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमधून आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. पण काही महिन्यांनंतर पक्षाची कार्यप्रणाली आणि संघटनात्मक रचनेवर नाराजी व्यक्त करत त्या पक्षातून बाहेर पडल्या होत्या.
“शेरशाह” नावाने प्रसिद्ध असलेले कॅप्टन विक्रम बत्रा १९९९ मधील कारगिल युद्धादरम्यान देशासाठी लढताना शहीद झाले होते. त्यांच्या अतुलनीय शौर्य, साहसामुळे त्यांना भारतातील सर्वोच्च आणि सर्वात प्रतिष्ठित शौर्य पुरस्कार परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले होते.
शहीद कैप्टन विक्रम बत्रा जी की माता श्रीमती कमलकांत बत्रा जी के निधन की दु:खद सूचना मिली।
हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माता जी को श्रीचरणों में स्थान दें और शोकाकुल परिवार को अपार दुःख सहने की क्षमता दें।
ॐ शांति!
– #HPCM ठाकुर @SukhuSukhvinder pic.twitter.com/y95PHblEp9
— CMO HIMACHAL (@CMOFFICEHP) February 14, 2024
Latest Marathi News कारगिल युद्धाचे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आई कमलकांत बत्रा यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.
