तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आजपासून राजकोटमध्ये खेळला जात आहे. मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी असल्याने तिसरा सामना जिंकून मालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs END 3rd Test)
सरफराज आणि ध्रुव जुरेलचे पदार्पण
सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. अनिल कुंबळे यांनी युवा खेळाडूंना पदार्पणाची कॅप सरफराजला दिली. तर दिनेश कार्तिकने ध्रुवकडे पदार्पणाची कॅप दिली. सर्फराज हा 311 वा तर ध्रुव कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा 312वा खेळाडू आहे. यावेळी सरफराजला पदार्पणाची कॅप दिल्यानंतर तो भावूक झाला. यावेळी त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते.
3RD TEST. India won the toss and elected to bat. https://t.co/FM0hVG5X8M #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 15, 2024
हेही वाचा :
Maratha Arkshan Andolan | मागण्या मान्य करा; अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाने जनतेत प्रक्षोभ : पृथ्वीराज चव्हाण
मराठा आरक्षणप्रश्नी शनिवारपासून इचलकरंजी बंदसह तीव्र आंदोलन
Latest Marathi News तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.
