बना इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट! जाणून घ्या ‘या’ क्षेत्रातील करिअरच्या संधी

जर आपल्याला फायनान्स, बॅकिंग, गुंतवणूक, स्टॅटिस्टिक्स, रिसर्च आणि इकोनॉमिक्समध्ये रस असेल तर एक इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट म्हणून करियरची निवड करणे ही एक उत्तम संधी ठरू शकते. जर आपण इक्विटी रिसर्च विश्लेषक होण्याचा पर्याय निवडत असाल तर आपण फायनान्स क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य निर्माण करू शकता. इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट कंपनीची आर्थिक माहिती, स्टॉकमधील शेअर, बाँड आणि अन्य … The post बना इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट! जाणून घ्या ‘या’ क्षेत्रातील करिअरच्या संधी appeared first on पुढारी.
बना इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट! जाणून घ्या ‘या’ क्षेत्रातील करिअरच्या संधी

सुचित्रा दिवाकर

जर आपल्याला फायनान्स, बॅकिंग, गुंतवणूक, स्टॅटिस्टिक्स, रिसर्च आणि इकोनॉमिक्समध्ये रस असेल तर एक इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट म्हणून करियरची निवड करणे ही एक उत्तम संधी ठरू शकते. जर आपण इक्विटी रिसर्च विश्लेषक होण्याचा पर्याय निवडत असाल तर आपण फायनान्स क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य निर्माण करू शकता.
इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट कंपनीची आर्थिक माहिती, स्टॉकमधील शेअर, बाँड आणि अन्य इक्विटी आणि आर्थिकसंबंधी घटकांचे सखोल अध्ययन करावे लागते. इक्विटी रिसर्च विश्लेषक कंपन्या या आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल तयार करतात. भांडवली बाजारातील एखाद्या संस्थेच्या प्रतिमेबाबतचे आऊटपूट देण्याचे काम रिसर्च अ‍ॅनालिस्ट करत असतात. कंपनीचा नफा आणि तोटा याचे विश्लेषण केले जाते आणि कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सल्ला देण्याचेही काम रिसर्च अ‍ॅनालिस्ट देत असतात. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट हा कोणत्याही संस्थेच्या आर्थिक विभागात संशोधन करण्याचे काम करत असतो. कारण तो एखाद्या संस्थेच्या शेअरची खरेदी-विक्री, राखून ठेवणे यासंबंधी निगडित सखोलपणे संशोधन करत असतो. या संशोधनातून फायदा आणि नुकसानीचा ताळेबंद करून तो संस्थेला होणारा फायदा आणि नुकसानीची निश्चिती करतो.
कार्यक्षेत्र
इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्टला काम करताना आर्थिक क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष द्यावे लागते. खरेदी आणि विक्री : खरेदीच्या श्रेणीत ब्रोकरेज हाऊसबरोबर साईड डील केले जाते तर ठोक ग्राहकांना सेवा प्रदान केली जाते. विक्रीच्या विभागात अनुसंधान संस्था आणि गुंतवणूक बँकांबरोबर व्यवहार केला जातो. आपण एक संशोधक, विश्लेषक, प्रायव्हेट इक्विटी विश्लेषक, प्रायव्हेट इक्विटी मॅनेजर, पोर्टफोलिओ मॅनेजर आदी होऊ शकता.
पात्रता आणि अभ्यासक्रम
जर आपल्याला इक्विटी रिसर्च विश्लेषक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने वाटचाल करत असाल तर जे उमेदवार कला आणि विज्ञान विषयात अभ्यास करत आहेत, ते उमेदवार देखील या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. आपल्याला अर्थखाते, अर्थशास्त्र, आर्थिक बाजार आणि अन्य आर्थिकसंबंधी मुद्द्यात सखोल ज्ञान आणि आवड असणे गरजेचे आहे. आपल्या अंगी उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे आणि आपले इंग्रजीवर प्रभुत्व असणे तितकेच महत्त्वाचे. काही परदेशी बाजारात स्थानिक भाषेची गरज असते. यासाठी या क्षेत्रात करिअर करताना परकीय भाषेचे ज्ञान देखील आपले करिअर अधिक उज्ज्वल करू शकते.
संधी
बँक, ब्रोकरेज, कंपनी, क्रेडिट रेटिंग इंडस्ट्रिज, बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्री, प्रायव्हेट इक्विटी फर्म, म्युच्युअल फंड, कन्सलटिंग फर्म आदीमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात आपल्याला कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवायचे आहे, हे ठरवणे गरजेचे आहे.
Latest Marathi News बना इक्विटी रिसर्च अ‍ॅनालिस्ट! जाणून घ्या ‘या’ क्षेत्रातील करिअरच्या संधी Brought to You By : Bharat Live News Media.