तिघा मद्यपींचा धुडगूस दहशतीचा प्रयत्न, दोघे ताब्यात

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
गंगापूर जकात नाका येथे मंगळवारी (दि.१३) रात्री मद्यपी टोळक्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत करण्याचा प्रयत्न केला. यात तीन वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून एक संशयित फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गंगापूर पोलिस ठाण्यात जय गजभिये (रा. प्रमोद नगर) यांनी फिर्याद दिली. ते त्यांच्या वाहनाने मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास गंगापूर जकात नाका येथून जात होते. त्यावेळी तिघा संशयितांनी रस्त्यात गोंधळ घालत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना थांबवले. तसेच तीन वाहनांची तोडफोड करीत वाहनचालकांना शिवीगाळ केली. या प्रकाराने परिसरात दहशत पसरली होती. तीन वाहनांचे नुकसान झाले. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास करीत दोघांना ताब्यात घेतले, तर एक संशयित फरार झाला आहे. संशयित मद्य पिऊन तोडफोड करीत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा:
US Firing : अमेरिकेतील कॅन्सस शहरात गोळीबारात एक ठार, २१ जखमी
मराठा आरक्षणप्रश्नी शनिवारपासून इचलकरंजी बंदसह तीव्र आंदोलन
शेततळ्यांना 44 कोटींचे अनुदान; पांडुरंग शेळके यांची माहिती
Latest Marathi News तिघा मद्यपींचा धुडगूस दहशतीचा प्रयत्न, दोघे ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.
